Join us

विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया

By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST


विनोद तावडे आणि शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची प्रतिक्रिया

दोन वर्षापूर्वी सदर शिक्षकाला नोकरीवरुन कमी करण्यात आले होते. पदनिर्मिती न करता ही भरती झालेली होती. प्रकरण उच्च न्यायालयात गेलेले आहे. तेथे सुनावणी सुरु आहे. त्यामुळे त्यात सरकार काहीही करु शकत नव्हते. मात्र अशी आत्महत्या करणे वाईट आहे, दु:खद आहे. न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा म्हणून सरकार प्रयत्नशिल आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

सदर शिक्षण पालिकेच्या शाळेत पार्टटाईम म्हणून कामास होता. या नियुक्त्या राईट टू एज्यूकेशन अंतर्गत केल्या गेल्या होत्या. त्या नियमाप्रमाणे भरल्या गेल्या नाहीत म्हणून रद्दही झाल्या होत्या. सरकारने नव्याने पोस्ट तयार केल्या आहेत मात्र आम्हालाच घ्या म्हणून काही जण न्यायालयात गेले आहेत, नगरपालिकेच्या शिक्षकांचा तसा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाशी थेट संबंध येत नाहीत. त्यामुळे याची माहिती मला देता येणार नाही.
- अश्विनी भीडे, सचिव, शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य