Join us

आ. मुंडे बातमी जोड

By admin | Updated: September 13, 2014 22:59 IST

इन्फो..

इन्फो..
मुंडेंच्या मृत्यूचे राजकारण करू नका
आपल्या वडिलांचे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू आहे. मात्र, या मृत्यूच्या चौकशीबाबत आता आमच्यापेक्षा विरोधकच जास्त राजकारण करीत आहेत. या चौकशीवर अद्याप मी समाधानी आहे. मात्र, ज्यावेळी मला वाटेल, मृत्यूबाबत काही वेगळे निष्कर्ष निघताहेत, त्यावेळी मी पाहिन, त्याची काळजी कोणी करू नये, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
आघाडीच्या विचारांशी मनसे संलग्न
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक राजकारणात अनेक घडामोडी होत असतात. नाशिक महापौरपदाच्या निवडणुकीत झालेली मनसे, कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी तशी नवीन गोष्ट नाही. मनसेने सत्ताधार्‍यांशी हातमिळवणी केली म्हणजे त्यांना सत्ताधार्‍यांचे विचार पटले असावे. त्या विचारांशी ते जास्त संलग्न झाले असावेत, असा टोलाही आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी मनसेला लगावला.