Join us

म्युच्युअल फंडांसाठीचे कलर कोड बदलणार

By admin | Updated: October 13, 2014 02:39 IST

विविध म्युच्युअल फंडांद्वारे आणण्यात येणाऱ्या योजनांमधील धोके ग्राहकांना लक्षात यावेत यासाठी केलेली कलर कोडची व्यवस्था अधिक व्यापक करण्याचा भारतीय प्रतिभूती आणि नियंत्रण मंडळाचा (सेबी) विचार आहे.

मुंबई : विविध म्युच्युअल फंडांद्वारे आणण्यात येणाऱ्या योजनांमधील धोके ग्राहकांना लक्षात यावेत यासाठी केलेली कलर कोडची व्यवस्था अधिक व्यापक करण्याचा भारतीय प्रतिभूती आणि नियंत्रण मंडळाचा (सेबी) विचार आहे. याबाबत सेबीने योजना आखली असून, ती अधिक चर्चेसाठी जाहीरही केली आहे.गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेतल्यानंतर सेबीने नवीन योजना तयार केली आहे. गुंतवणूकदारांना आपण ज्या योजनेत गुंतवणूक करीत आहोत ती किती धोकादायक आहे हे स्पष्ट व्हावे यासाठी अधिक रंगांचे अर्ज वापरण्याची सक्ती सेबी करू शकते. सध्या म्युच्युअल फंडांच्या इक्विटी योजनांसाठी करड्या (ब्राऊन) रंगाच्या अर्जांचा वापर होतो; मात्र या योजनांमधील काही योजना जास्त धोकादायक असतात, तर काही कमी. त्यांच्यातील फरक लक्षात येत नसल्याची गुंतवणूकदारांची तक्रार आहे. (प्रतिनिधी)