नवी दिल्ली : भारताच्या कॉफी निर्यातीत २०१४-१५ या विपणन वर्षात किरकोळ वाढ होऊन ती ५०.२ लाख टन होण्याची अपेक्षा आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय कॉफीचे दर मात्र चढेच राहिले आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.भारताने विपणन वर्ष २०१३-१४ मध्ये (आॅक्टोबर ते सप्टेंबर) ४८ लाख बॅग कॉफी निर्यात केली होती. एका बॅगेत ६० किलो कॉफी असते.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्याच्या पातळीवर कॉफीचे भाव ३५ टक्क्यांनी जास्त असून उत्पादक आणि मोठ्या निर्यातदारांनी भाव आणखी वाढतील या अपेक्षेने माल अडवून ठेवला आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
कॉफी निर्यातीत यंदा होणार वाढ
By admin | Updated: November 20, 2014 01:34 IST