Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉफी निर्यातीत १३.३९ टक्के वाढ

By admin | Updated: April 5, 2016 00:24 IST

मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातातून कॉफीची निर्यात १३.३९ टक्क्यांनी वाढली असून या वर्षात ३,१९,७३३ टन कॉफी भारतातून निर्यात झाली.

नवी दिल्ली : मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षात भारतातातून कॉफीची निर्यात १३.३९ टक्क्यांनी वाढली असून या वर्षात ३,१९,७३३ टन कॉफी भारतातून निर्यात झाली. इन्स्टंट कॉफी आणि अन्य प्रकारच्या कॉफीची निर्यात वाढल्याने एकूण निर्यात वाढ झाली. कॉफी बोर्डाच्या ताज्या अहवालानुसार २०१४-१५ या आर्थिक वर्षात भारतातून २,८१,९८७ टन कॉफी निर्यात झाली होती. जागतिक पातळीवर भाव कमी असला तरी प्रति युनिट मिळणारे मूल्य कमी होते.