नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढल्यामुळे गेल्या आॅक्टोबर महिन्यात कोळशाची आयात १३.७ टक्के घसरून १५.५९ दशलक्ष टनांवर आली. गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात देशाने १८.०८ मेट्रिक टन कोळसा आयात केला होता, असे स्टील अॅथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेड (सेल) आणि टाटा स्टीलने सांगितले. आॅक्टोबर २०१६मध्ये सर्व प्रकारच्या कोळशाची आयात १५.५९ दशलक्ष टन होती ती आॅक्टोबर २०१५मध्ये १८.०९ मेट्रिक टन तर सप्टेंबर २०१६मध्ये ती १५.५५ मेट्रिक टन होती. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होतील या अपेक्षेने भारतीय खरेदीदारांनी उशीर लावल्याने कोळशाची आयात गेल्या आॅक्टोबरमध्ये कमी होती.
कोळशाच्या आयातीत १३.७ टक्के घसरण
By admin | Updated: November 7, 2016 00:21 IST