Join us

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाद्वारे सहकारी बँकांची ७ आॅक्टोबरला मुंबईत परिषद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:57 IST

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाने ७ आॅक्टोबर रोजी सहकारी बँकांची परिषद आयोजित केली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६पर्यंत ही परिषद रंगणार आहे.

मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाने ७ आॅक्टोबर रोजी सहकारी बँकांची परिषद आयोजित केली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६पर्यंत ही परिषद रंगणार आहे.या परिषदेमध्ये आरबीआयचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, एनएएफसीयूबीचे अध्यक्ष आर.बी. शांडिल्य, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, कॉसमॉस बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. मुकुंदराव अभ्यंकर, सहकारी भारतीचे सतीश मराठी आदी मार्गदर्शन करणार आहेत.याशिवाय माजी अर्थ राज्यमंत्री खासदार आनंद अडसूळही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये बँक क्षेत्रातील ३००हून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :बँक