Join us

ग्राहकांच्या खिशाला कात्री, पेट्रोल - डिझेल महागले

By admin | Updated: November 15, 2015 19:42 IST

दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १५ -  दिवाळी संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून पेट्रोलच्या दरात प्रति लीटरमागे ३६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लीटरमागे ८७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आज मध्यरात्री १२ वाजेपासून ही नवीन दरवाढ लागू होणार आहे. 

रविवारी संध्याकाळी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. दिवाळीत डाळ व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या दिवाळे निघाले होते. आजपासून सेवा करासोबतच अतिरिक्त ०.५ टक्के स्वच्छ भारत अधिभार लागू झाल्याने रेल्वेप्रवासही महागला आहे. त्यापाठोपाठ पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागतील असे दिसते.