Join us
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण

By admin | Updated: February 27, 2017 04:52 IST

नोटाबंदीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. त्या जागेवर नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत

लंडन : नोटाबंदीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. त्या जागेवर नव्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमीच्या विद्यार्थ्यांना ते संबोधित करत होते. जेटली म्हणाले की, नोटा बंद करण्याचा निर्णय हा महत्त्वपूर्ण निर्णय होता. या माध्यमातून उच्च आर्थिक वृद्धिदर गाठता येईल. नगदी आधारित अर्थव्यवस्थेच्या जागेवर डिजिटल अर्थव्यवस्था आणण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय होता. यामुळे बँकिंग प्रणालीत अधिक पैसा येईल आणि महसूल वाढेल. अनौपचारिक अर्थव्यवस्थेला औपचारिक अर्थव्यवस्था करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नोटाबंदीनंतर जीडीपीमध्ये वाढेल, असेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. जगाचा विकास दर जर मंदावला, तर भारतावरही याचा परिणाम होतो, पण आज ७ ते ८ टक्क्यांचा वृद्धिदर भारतासाठी सामान्य दर बनला आहे. भारताला अशा वेळी जर जागतिक अर्थव्यवस्थेची साथ मिळाली, तर हा दर आणखी उंचावर जाऊ शकतो. काही राज्यांचा विकासदर राष्ट्रीय स्तराच्या तुलनेत चार ते पाच टक्क्यांनी अधिक असून, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील वृद्धीलाही गती येत आहे, असे सांगून त्यांनी अशा राज्यांचे कौतुक केले.>भारत ब्रेन बँक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना जेटली म्हणाले की, ‘भारत ब्रेन बँक म्हणून पुढे येत आहे. भारतीय केवळ भारतासाठी आहेत, असे मी आता म्हणणार नाही. मी महाविद्यालयात असताना ब्रेन ड्रेनची संकल्पना होती, पण आज भारतीय अनेक अर्थव्यवस्थेत दिसत आहेत. जागतिक चर्चेत मानव संसाधनाच्या हालचाली हा प्रमुख विषय आहे.’