Join us

सराफा व्यापाऱ्यांचा बंद २२ व्या दिवशीही सुरूच

By admin | Updated: March 24, 2016 00:33 IST

दागिन्यांवरील एक टक्का अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापारी आणि कारागिरांनी सुरू केलेला बंद बुधवारी सलग २२ व्या दिवशीही सुरूच होता

नवी दिल्ली : दागिन्यांवरील एक टक्का अबकारी कराच्या विरोधात सराफा व्यापारी आणि कारागिरांनी सुरू केलेला बंद बुधवारी सलग २२ व्या दिवशीही सुरूच होता. २ मार्चपासून राजधानी दिल्लीसह देशातील बहुतांश सोन्या-चांदीची दुकाने बंदआहेत. सराफांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांच्या नेतृत्वाखाली एका पॅनलची स्थापना केली आहे.पॅनलला ६0 दिवसांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तरीही बंद मागे घेण्यास व्यापारी-कारागिरांनी नकार दिला आहे.