Join us
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्यांचा दुसऱ्या दिवशीही बंद

By admin | Updated: March 4, 2016 02:19 IST

दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याच्या निर्णयाविरुद्ध सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी बंद गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता

नवी दिल्ली : दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याच्या निर्णयाविरुद्ध सराफा व्यापाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी बंद गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सुरू होता. राजधानी दिल्लीसह देशातील सर्व प्रमुख शहरांतील बहुतांश सोन्या-चांदीची दुकाने बंद होती.आॅल इंडिया सराफा असोसिएशनने या बंदचे आवाहन केले आहे. असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्रकुमार जैन यांनी सांगितले की, सर्व महानगरांत सराफा व्यावसायिकांनी आज आपली दुकाने बंद ठेवली. १ टक्का अबकारी कराचा सराफा व्यवसायावर अत्यंत वाईट परिणाम होणार आहे. ९0 टक्के छोटे व्यावसायिक बाजाराबाहेर फेकले जातील. जयपूर, लखनौ, चंदीगड आणि जम्मू येथील सराफा व्यावसायिक आज बंदमध्ये सहभागी झाले. त्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. जैन यांनी सांगितले की, २0१२ मध्ये तत्कालीन सरकारने बिगर ब्रँडेड दागिन्यांवर १ टक्का अबकारी कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला होता. सराफा व्यावसायिकांच्या विरोधानंतर तो मागे घेण्यात आला होता.