Join us
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत कापड उद्योग बंद

By admin | Updated: July 6, 2017 01:26 IST

पाच टक्के जीएसटी कराच्या निषेधार्थ तामिळनाडूतील कापड उत्पादकांनी बुधवारपासून बंद पुकारला आहे. तामिळनाडूत कोइम्बतूर, इरोड,

चेन्नई : पाच टक्के जीएसटी कराच्या निषेधार्थ तामिळनाडूतील कापड उत्पादकांनी बुधवारपासून बंद पुकारला आहे. तामिळनाडूत कोइम्बतूर, इरोड, तिरुपूर, सेलम, नमक्कल आणि करूर या ठिकाणी कापड उद्योग आहे. जीएसटीअंतर्गत मुख्य कापड उत्पादकांवर १८ टक्के कर लावण्यात आला आहे. तसेच जॉब वर्क करणाऱ्यांवर ५ टक्के कर आहे. मुख्य उत्पादक जॉब वर्कवाल्यांना कच्चा माल पुरवितात. त्यातून जॉबवर्कवाले मुख्य उत्पादकांसाठी कापड तयार करतात. आधी सरकारने जॉबवर्कवाल्यांनाही १८ टक्के कर लावला होता. नंतर तो ५ टक्के करण्यात आला. हा ५ टक्के करही रद्द करण्याची मागणी आता करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था) कापड व्यापाऱ्यांचा अहमदाबादेत बंदअहमदाबाद : कापडावर ५ टक्के वस्तू व सेवाकर लावल्याच्या निषेधार्थ अहमदाबाद येथील कापड व्यापाऱ्यांनी बंद पाळला. अहमदाबाद ही देशातील सर्वांत मोठी कापड बाजारपेठ आहे. बंदमुळे तेथील व्यवहार ठप्प झाले. त्याआधी सुरत येथील कापड व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यानंतर तेथे तणाव निर्माण झाला होता. अहमदाबादेतील मस्कती क्लॉथ मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष गौरांग भगत यांनी सांगितले की, आम्ही सुरत येथील तणावाचा निषेध करतो. (वृत्तसंस्था)