Join us  

अस्थिर वातावरणामध्ये झाली चौफेर घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:57 AM

लोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची होऊ घातलेली रंगीत तालीम, त्यामुळे असलेली राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची लागून राहिलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेली विक्री, यामुळे शेअर बाजारातील वातावरण अस्थिर आहे.

- प्रसाद गो. जोशीलोकसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांची होऊ घातलेली रंगीत तालीम, त्यामुळे असलेली राजकीय अस्थिरता, अर्थव्यवस्थेच्या प्रकृतीची लागून राहिलेली चिंता, परकीय वित्तसंस्थांकडून सातत्याने होत असलेली विक्री, यामुळे शेअर बाजारातील वातावरण अस्थिर आहे. त्यातच काही आस्थापनांचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे न आल्याने निराशा दाटली. परिणामी, बाजारात घसरण झाली.शेअर बाजारातील वातावरण संमिश्र राहिले असले, तरी बाजारावरील अस्वलाची पकड घट्ट होत असलेलीच दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३४९७१.८३ असा वाढीव पातळीवर खुला झाला. त्यानंतर, तो ३५६०५.४३ ते ३४१४०.३२ अंशांदरम्यान खालीवर झाला. सप्ताहाच्या अखेरीस तो ३४३१५.६३ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकापेक्षा तो ४१७.९५ अंशांनी खाली आला आहे.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) मध्येही १६८.९५ अंशांची घट होऊन १०३०३.५५ अंशांवर बंद झाला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घटच झाली. मिडकॅप निर्देशांक १४०५८.३० अंशांवर (घट २२७.९२ अंश) बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक १४०८२.९२ अंशांवर बंद झाला आहे. गतसप्ताहापेक्षा त्यात ७६.५१ अंशांची घट झाली आहे.अमेरिकेच्या एचबी१ या व्हिसाबाबतच्या धोरणाचा मोठा फटका भारताला बसण्याची शक्यता असल्याने, माहिती तंत्रज्ञान आस्थापनांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे या समभागांचीविक्री झाली. त्याचप्रमाणे,रिलायन्सचे निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याने त्याचाही फटका बाजाराला बसला.परकीय वित्तसंस्थाची कायम असलेली विक्री, अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत लागून राहिलेली चिंता, घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित झालेली चलनवाढ, चीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये असलेली मंदी, तसेच अमेरिकेने स्वीकारलेले वाट बघण्याचे धोरण याचाही फटका बाजाराला बसून विक्रीचा वेग वाढला.

टॅग्स :निर्देशांकशेअर बाजार