Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिटफंड कंपन्यांचा ‘मल्टी स्टेट’ चेहरा

By admin | Updated: December 8, 2014 02:01 IST

पश्चिम बंगालमध्ये जवळपास वर्षभर भूमिगत झालेल्या चिट फंड योजना ‘मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या नावाने सक्रिय झाल्या आहेत.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये जवळपास वर्षभर भूमिगत झालेल्या चिट फंड योजना ‘मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या नावाने सक्रिय झाल्या आहेत. राज्याचे सहकारमंत्री ज्योतिर्मय कार यांनी सांगितले की, काही संघटना राज्यात केंद्र सरकारकडे मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या नावाने नोंदणी करून गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आश्वासन देऊन पैसा गोळा करीत आहेत. या कंपन्यांकडे ना राज्याचे ना हरकत प्रमाणपत्र ना रिझर्व्ह बँकेची परवानगी. आमचा असा संशय आहे की चिटफंड कंपन्या पूर्वी राज्यात बेकायदा मार्गांनी पैसा गोळा करायच्या आता त्या मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या नावाने तो गोळा करीत आहेत. कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून या कंपन्या मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या नावाचा आधार घेत आहेत, असेही कार म्हणाले. २०१३ मध्ये शारदा चिटफंड घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यात अनेक चिटफंड कंपन्यांना कारभार बंद करावा लागला होता. मल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटी म्हणजे एकापेक्षा जास्त राज्यांत तिचा कारभार आहे.