Join us  

चीनचा आर्थिक वृद्धिदर २७ वर्षांच्या नीचांकावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:23 AM

चीनच्या आर्थिक वृद्धी दराची गती तीन दशकांच्या नीचांकावर ६.२ टक्क्यांवर आली आहे.

बीजिंग : चीनच्या आर्थिक वृद्धी दराची गती तीन दशकांच्या नीचांकावर ६.२ टक्क्यांवर आली आहे. अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने चीनच्या जीडीपी वृद्धी दरात घट झाली आहे. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार सकल घरेलु उत्पादनाचा (जीडीपी) वृद्धिदर पहिल्या तिमाहीत ६.४ टक्क्यांवरून कमी होऊन ६.२ टक्के टक्क्यांवर आला आहे. जीडीपीचा हा दर दुसऱ्या तिमाहीतील गत २७ वर्षांतील सर्वात कमी आहे.यामुळे चीनमध्ये चिंतेचे वातावरण आहे. देशाचा आर्थिक वृद्धिदर २००९ मध्ये जागतिक आर्थिक मंदीतही ६.४ टक्क्यांवरून खाली आला नव्हता. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोने दिलेल्या आकडेवारीनुसार पहिल्या सहामाहीत सकल घरेलू उत्पादन वार्षिक आधारावर ६.३ टक्क्यांनी वाढून ४५,०९० अब्ज युआन (जवळपास ६,५६० अब्ज डॉलर) झाले. दुसºया तिमाहीत जीडीपी वृद्धिदराची गती ६.२ टक्के आहे. जीडीपीची ही आकडेवारी पूर्ण वर्षासाठीच्या सरकारच्या ६.० ते ६.५ टक्के या लक्ष्यानुसार आहेत. (वृत्तसंस्था)