Join us

बालकामगार, बालकांचे कायदे विषयावर मार्गदर्शन

By admin | Updated: September 30, 2014 21:39 IST

आकोट : स्थानिक परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व श्री आसरामाता नवदुर्गा नवरात्र मंडळ जिनगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार व बालकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन शिबिर पार पडले.

आकोट : स्थानिक परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व श्री आसरामाता नवदुर्गा नवरात्र मंडळ जिनगरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालकामगार व बालकांचे कायदे या विषयावर मार्गदर्शन शिबिर पार पडले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालकल्याण समिती अकोलाचे अध्यक्ष संजय शेंगर होते, तर मार्गदर्शक बालकांच्या हक्कासाठी विधी साहाय्यक कक्ष अकोलाचे समन्वयक ॲड. नितीन धूत तसेच परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विवेक नगरे यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बालकामगार व बालकांचे हक्क, कायदे या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. यासोबतच विवेक नगरे व नवदुर्गा मंडळ अध्यक्ष संतोष बुंदेले यांचेही भाषण झाले. संचालन मेघा नगरे व आभारप्रदर्शन रिंकू शर्मा हिने केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे व दुर्गा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
फोटो : ३०एकेटीपी०१.जेपीजी