Join us

मुख्यमंत्री आजपासून जपान दौऱ्यावर

By admin | Updated: September 8, 2015 01:19 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोयासान विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच इतर विविध औद्योगिक- आर्थिक विषयक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ उद्या (दि. ८) जपानच्या दौऱ्यावर रवाना होत आहे. या शिष्टमंडळात उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांचा समावेश आहे. कोयासान आणि डॉ. आंबेडकर विद्यापीठात करार होणार आहे. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक (एमटीएचएल) आणि मेट्रो प्रकल्पांसाठी जपानच्या व्यापार आणि आर्थिक व्यवहारविषयक विभागाशी राज्य शासनाचा करार होणे अपेक्षित आहे.