Join us

छत्रपती शाहू विद्यालयाच्या मुलींचा कबड्डी संघ जिल्हा स्तरावर

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

वरूर जऊळका : महाराष्ट्र शासन क्रीडा विभागातर्फे आयोजित ६० व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील छत्रपती शाहू विद्यालयातील मुलींच्या कबड्डी संघाने तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तरावर झेप घेतली आहे.

या कबड्डी संघामध्ये सीमा होळकर, मंगला नांदोकार, दीपाली सरकटे, बबिता खंडारे, पूनम थोरात, कांचन तायडे, गंगा खंडारे, एश्वर्या गावंडे, वैष्णवी खेकडे, प्रतीया इंगळे, विद्या इंगळे, सोनिका धांडे आदींचा समावेश होता. संघाचे प्रशिक्षक म्हणून विजय सोलकर यांनी तर विभागप्रमुख म्हणून अजय गावंडे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय मुख्याध्यापक एस. एस. भावे, प्रमोद फुके, श्रीकृष्ण सावळे, लांबट, सरकटे यांना दिले. या विजयाबद्दल गावात व परिसरात त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)
फोटो : १०एकेटीपी०५.जेपीजी
कॅप्शन : विजयी संघासोबत शिक्षकवृंद.
................
.............