नवी दिल्ली : वाढलेला पुरवठा आणि डॉलरमधील मजबुती यामुळे जागतिक बाजारात खाद्यवस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात उतरल्या आहेत. फेब्रुवारीतील आकडेवारीनुसार खाद्यवस्तूंच्या किमती पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्या आहेत.संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य आणि कृषी संघटनेने (एफएओ) ही माहिती दिली. त्यानुसार, फेब्रुवारीत खाद्यवस्तूंचा किंमत निर्देशांक १७९.४ अंकांवर राहिला. जानेवारीत तो १८१.२ अंकांवर होता. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत तो २0८.६ अंकांवर होता. एफएओचा खाद्य किंमत निर्देशांक व्यापार भारांश निर्देशांक आहे. जागतिक बाजारातील प्रमुख पाच वस्तूंच्या किमतींवर तो आधारलेला आहे. धान्ये, मांस, डेअरी उत्पादने, खाद्यतेले आणि साखर यांचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रत्येक वस्तूच्या किंमत उप-निर्देशांकाला तो जोडतो. एफएओने म्हटले की, खाद्य किंमत निर्देशांक फेब्रुवारीत ५५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. जानेवारीच्या तुलनेत १.0 टक्के, तर वार्षिक आधारावर १४ टक्के कमी आहे.
जागतिक बाजारात खाद्यवस्तू स्वस्त
By admin | Updated: March 10, 2015 00:01 IST