ब्राांड कयावर रंगल्या गिटारसोबत गप्पा आणि गाणी
By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST
ठाणे - गिटारबद्दल सविस्तर माहिती, त्याच्या सहाय्याने सादर केलेली सदाबहार हिंदी-मराठी गीते आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद असे वातावरण रंगले होते ते नुकत्याच ब्राांड कयावर पार पडलेल्या गिटार सोबत गप्पा आणि गाणी या कार्यक्रमात.
ब्राांड कयावर रंगल्या गिटारसोबत गप्पा आणि गाणी
ठाणे - गिटारबद्दल सविस्तर माहिती, त्याच्या सहाय्याने सादर केलेली सदाबहार हिंदी-मराठी गीते आणि त्याला प्रेक्षकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद असे वातावरण रंगले होते ते नुकत्याच ब्राांड कयावर पार पडलेल्या गिटार सोबत गप्पा आणि गाणी या कार्यक्रमात. गिटारवादक गौरव गोगटे आणि श्रेयस पाटकर यांनी हा कार्यक्रम सादर केला. मराठी आणि हिंदी मालिकांचे संगीतकार डी.एस.रूबेन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरूवातीला श्रेयस यांनी ऐकोस्टीक,हवाईन, इलेक्ट्रिक आणि बेसगीटार असे गिटारचे चार प्रकार आणि त्यातील फरक स्पष्ट करून सांगितला. रिदम्शिवाय फक्त मेलडीच्या सहाय्याने नवीन संकल्पनेनुसार गीत सादर करत श्रोत्यांची वाहवा मिळविली.यानंतर अजीब दास्तां है ये...,तुम आ गये हो...,आने वाला पल जानेवाला है...अशी विविध सदाबहार गाणी गौरव आणि श्रेयस यांनी सादर केली. तर सौमित्र यांचे गारवा...,जोगवा चित्रपटातील जीव रंगला..., टाईमपास चित्रपटातील मला वेड लागले प्रेमाचे... या श्रेयस आणि वैदेही यांनी सादर केलेल्या द्वंद्व गीतांना प्रेक्षकांनी वन्समोअरची दाद दिली. तर प्रेक्षकांनी उत्सफूर्तपणे फर्माईश केलेली गीतेही सादर करण्यात आली.(प्रतिनिधी)