Join us  

जीएसटी परिपत्रकांमधील बदल स्वागतार्हच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2019 1:09 AM

जूनमध्ये झालेल्या ३६ व्या जीएसटी कौन्सिल मीटिंगमध्ये सीबीआयसीने अधिसूचना व परिपत्रकांचा पाऊस पाडला आहे, त्यात नेमके आहे काय?

- उमेश शर्मा  (सीए)करनीती भाग-२९२

अर्जुन : (काल्पनिक पात्र) कृष्णा, भारतात सर्वत्र मान्सुनची सुरुवात झाली आहे, त्याचप्रमाणे जीएसटीमध्येही जूनमध्ये झालेल्या ३६ व्या जीएसटी कौन्सिल मीटिंगमध्ये सीबीआयसीने अधिसूचना व परिपत्रकांचा पाऊस पाडला आहे, त्यात नेमके आहे काय?कृष्ण : (काल्पनिक पात्र) अर्जुना, जीएसटीत आलेल्या अधिसूचना व परिपत्रके आपण पाहू१) पुरवठादाराने विक्रीनंतर दिलेली सूट ही पुरवठा मूल्यात धरली जाणार नाही, जर डीलरकडून त्या सूटसंबंधी काही दायित्व नसेल तर, परंतु जर सूट ही विक्रीसंबंधी प्रोत्साहन देण्यासाठी असेल तर ती त्यात मोजावी लागेल.उदा. : जर डिलरने पुरवठादारासाठी वस्तूंचे प्रदर्शन भरविले असेल व त्या मोबदल्यात त्यास अधिक सूट मिळत असेल तर तो वस्तू व सेवेचा पुरवठा डिलरअंतर्गत करयोग्य धरला जाईल. त्याचप्रमाणे विक्रीपूर्वी व विक्रीनंतर दिलेली सूट याबाबत सावध असणे गरजेचे आहे.२) डिलरला वस्तूंचा पुरवठा हा विशेष कमी किमतीत करता यावा व उलाढाल वाढावी यासाठी पुरवठादाराने डिलर्सला दिलेली सूट ही करयोग्य धरली जाईल, कारण ही विक्रीपूर्वी दिलेली सूट नाही.३) विक्रीपूर्वी दिलेल्या सूटवरील आयटीसी रिव्हर्स करण्याची गरज नाही जर ती योग्य पद्धतीने क्रेडिट अथवा डेबिटनोटद्वारे केली असेल व त्यात करासंबंधी काहीही नसेल. हा एक स्वागत करण्यायोग्य बदल आहे.जीएसटीतील तारखांमधील इंद्रधनुष्य :१) जीएसटी आॅडिट रिपोर्ट व वार्षिक रिर्टनची अंतिम तारीख वाढवून ३१ आॅगस्ट करण्यात आली.२) जसे जीएसटीआर - ७ (आॅक्टोबर १८ ते जुलै १९) आणि जीएसटी आयटीसी - ४ (जुलै २0१७ ते जून २0१९) फाइल करण्याची अंतिम तारीख ही ३१ आॅगस्ट २0१९ पर्यंत वाढविण्यात आली.३) ज्या नोंदणीकृत करदात्यांचा पुरवठा हा १.५ कोटींपर्यंत त्यांच्यासाठी जीएसटीआर - १ (जुलै २0१९ ते सप्टेंबर २0१९) दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर २0१९ आहे.४) ज्यांचा पुरवठा १.५ कोटीपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी जीएसटीआर - १ (जुलै ते सप्टेंबर २0१९) फाइल करण्याची अंतिम तारीख ही पुढील महिन्यातील अकरावा दिवस असेल.५) त्याचप्रमाणे जीएसटीआर - ३ बी (जुलै ते सप्टेंबर २0१९) फाइल करण्याची अंतिम तारीख ही पुढील महिन्यातील २० असेल.ज्याप्रमाणे पावसात छत्रीद्वारे संरक्षण केले जाते. त्याचप्रमाणे करदात्याला जीएसटी पीएमटी - 0९ द्वारे चुकीच्या हेडअंतर्गत केलेल्या करांचे व्याजांचे व दंडाचे योग्य हेडअंतर्गत वर्गीकरण करता येईल.उदा. : जर करदात्याने एसजीएसटीअंतर्गत असलेले पेमेंट सीजीएसटीमध्ये केले असेल तर ते जीएसटी पीएमटी - 0९ द्वारे दुरुस्त करता येईल. ज्याप्रमाणे मान्सूनची सुरुवात ही उशिरा झाली त्याचप्रमाणे जीएसटीआर - 0९ अंतर्गत उशिरा आलेले अपेक्षित बदल खालीलप्रमाणे :१) पूर्वी जीएसटीआर - 0९ अंतर्गत एप्रिल ते सप्टेंबर २0१९ पर्यंत असलेल्या दुरुस्तींची माहिती द्यावी लागणार होती. परंतु कायद्यात त्यासंबंधी बदल करून आता ती मार्च २0१९ पर्यंतच्या सर्व दुरुस्तींची माहिती जीएसटी-0९ अंतर्गत देता येईल.२) जी व्यक्ती जीएसटीअंतर्गत नोंदणी करत असेल त्याला पूर्वीप्रमाणे बँकेसंबंधी लगेच माहिती न देता ती पुढील ४५ दिवसांच्या आत द्यावी लागेल.३) जसा पावसाळा शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन येतो त्याचप्रमाणे कम्पोझिशन डिलर्ससाठी जीएसटीअंतर्गत आता वर्षातून एकदाच जीएसटीआर - 0४ रिटर्न फाइल करावे लागेल व कर हे प्रत्येकी तिमाही फॉर्म सीएमपीअंतर्गत भरावा लागेल.

टॅग्स :जीएसटी