Join us
Daily Top 2Weekly Top 5

चंदा कोचर यांनी सक्तीच्या रजेला केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 03:45 IST

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ या नात्याने पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा चंदा कोचर यांनी तीव्र विरोध केल्याचे समोर आले आहे.

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ या नात्याने पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या निर्णयाचा चंदा कोचर यांनी तीव्र विरोध केल्याचे समोर आले आहे. बँकेच्या संचालकांनी सोमवारच्या बैठकीत हा निर्णय घेतला, त्या वेळी चंदा कोचर यांनी ‘उद्धट’ स्वरूपाचा पवित्रा घेतला. पती दीपक कोचर व दीर राजीव कोचर यांच्या नूपॉवर कंपनीमार्फत व्हिडीओकॉन समूहाला कर्ज दिल्याप्रकरणी कोचर यांची बँकेकडून चौकशी सुरू आहे. सध्या वार्षिक सुट्टीवर असलेल्या कोचर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला. हा निर्णय न पटल्याने रागारागात चंदा कोचर बैठक सोडून निघून गेल्या.