Join us

चंदा कोचर यांना क्लीन चिट देणारा अहवाल घेतला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 04:02 IST

चंदा कोचर यांना नातलगांना लाभ मिळवून दिल्याच्या आरोपातून मुक्त करणारा २0१६ सालचा आपला अहवाल कायदे संस्था ‘सिरिल अमरचंद मंगलदास’ने मागे घेतला आहे.

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना नातलगांना लाभ मिळवून दिल्याच्या आरोपातून मुक्त करणारा २0१६ सालचा आपला अहवाल कायदे संस्था ‘सिरिल अमरचंद मंगलदास’ने मागे घेतला आहे.बँकेने सेबीला दिलेल्या दस्तावेजांत याची माहिती दिली आहे. या आरोपांतून कोचर यांना यंदाच्या मार्चमध्ये क्लीन चिट देताना सिरिल अमरचंद मंगलदासच्या अहवालाचा आधार घेतला होता. हा अहवालच मागे घेत यास वैध धरण्यात येऊ नये, असे या कायदे संस्थेने म्हटले आहे.