Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्ह्यांचे आव्हान : बँकांना हवे ‘विमा कवच’

By admin | Updated: February 20, 2017 00:55 IST

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आता बँका यासाठी विमा घेण्याचा विचार करीत आहेत.

मुंबई : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना आता बँका यासाठी विमा घेण्याचा विचार करीत आहेत. नोटाबंदीनंतर सरकारने डिजिटलवर भर दिला असतानाच विम्याबाबतही बँका गांभीर्याने विचार करीत आहेत.  २०१५-१६मध्ये सायबर गुन्ह्यांमुळे ४ अब्ज डॉलरचे नुकसान झाले  आहे. तर, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांमुळे हे नुकसान ४५ अब्ज  डॉलर एवढे आहे. विमा उद्योगातील एका अहवालानुसार, सायबर  गुन्ह्यांत दरवर्षी ४० ते ५० टक्के  वाढ होत आहे. जागतिक स्तरावर जोखमेसाठीचा विमा प्रिमियम २०१६मध्ये ३.५ अब्ज डॉलरचा  होता. (वाणिज्य प्रतिनिधी)