परिचारकांच्या उमेदवारीमुळे चैतन्य
By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST
मंगळवेढा : जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारकांची उमेदवारी महायुती अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला शेतकर्यांचे नेतृत्व करण्यासाठी सहकारातील जाणता उमेदवार मिळाला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते व मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
परिचारकांच्या उमेदवारीमुळे चैतन्य
मंगळवेढा : जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारकांची उमेदवारी महायुती अंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाहीर झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला शेतकर्यांचे नेतृत्व करण्यासाठी सहकारातील जाणता उमेदवार मिळाला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील कार्यकर्ते व मतदारांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.सहकारातील डॉक्टर सुधाकरपंत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांनी र्शीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, दि. पंढरपूर अर्बन को?ऑप. बँक, कर्मयोगी पतसंस्था, जिल्हा दूध संघ, विविध कार्यकारी सोसायट्या, दूध संस्था निर्माण करून पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेला आधार दिला आहे. दोन वर्षे पडलेल्या दुष्काळात सुरू असलेल्या चारा छावण्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात मूरघास, पशुखाद्य देण्याबरोबरच दुष्काळात जनतेला आधार देण्यासाठी 18 हजार गाई वाटप करून दुग्धोत्पादन वाढवून रोजगार मिळवून देण्याबरोबरच आर्थिक सुबत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळात होरपळणार्या जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. यावेळी वाड्यावस्त्यांवर पाणी साठविण्यासाठी साधने उपलब्ध नसल्याने पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पांडुरंग अर्बन बँक, जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून वाड्यावस्त्यांवर सिंटेक्स टाक्या देऊन जनतेला पाणी साठविण्याची व्यवस्था केली. यामुळे दुष्काळात दुष्काळग्रस्तांना पाणी साठविण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही. पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून विविध तलाव, बंधारे, ओढे, नाले यामधील गाळ काढून पाणी साठवण्यासाठी खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण करण्याच्या कामात सहभाग घेऊन तालुक्याच्या विकासात हातभार लावला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून ते पंढरपूर?मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणार असल्याने भविष्यात दोन्ही तालुक्यात असलेल्या समस्या विविध माध्यमातून प्रशांत परिचारक सोडवतील, अशी आशा दोन्ही तालुक्यातील मतदारांतून व्यक्त होत आहे. इन्फो बॉक्स::::::::विकासाची दृष्टीप्रशांत परिचारक यांनी आतापर्यंत विविध संस्थेच्या माध्यमातून विकासकामे केल्याने त्यांच्याकडे विकासाची एक वेगळी दृष्टी आहे. यामुळे ते दोन्ही तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी आखाड्यात उभे असल्याने भविष्यात त्यांच्या नेतृत्वातून तालुक्याचा विकास शक्य होण्यास मदत होणार आहे.