Join us  

Sukanya Samriddhi Yojana Rules Change: सुकन्या योजनेचे नियम बदलले! सरकारने केलेले ‘हे’ ५ बदल जाणून घ्या अन् लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:10 PM

Sukanya Samriddhi Yojana Rules Change: सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हीही खाते उघडले असल्यास हे नियम पाहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. पाहा, डिटेल्स...

नवी दिल्ली:केंद्र सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेकविध प्रकारच्या योजना आणल्या आहेत. यामध्ये गुंतवणुकीच्याही नाना योजनांचा समावेश असून, यातून मिळणाऱ्या चांगल्या आणि निश्चित परताव्यामुळे या योजना अतिशय लोकप्रिय झालेल्या पाहायला मिळतात. घरातील कन्यारत्नासाठी विशेष असलेली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. (Sukanya Samriddhi Yojana) मुलीच्या पालकांसाठी २०१५ मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. राज्य प्रायोजित बचत योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच मुलीच्या लग्नाचा खर्चही होतो. या योजनेच्या नियमात सरकारकडून काही बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल महत्त्वाचे असून, हे ध्यानात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. 

सुकन्या समृद्धी योजना खाते मुलगी जन्माला येताच ती १० वर्षांची होईपर्यंत २५० रुपये ठेवीसह उघडू शकतात. सध्या ही योजना ७.६ टक्के व्याजदर देत आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून २१ वर्षे किंवा मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत सक्रिय राहील. तसेच जर संबंधित व्यक्ती पुरावा देऊ शकत नसेल, तर त्यांना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत १०० रुपये शुल्क भरावे लागेल जिथे हस्तांतरण केले जाईल.

सुकन्या समृद्धी योजनेतील बदललेले ५ नियम

१. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खात्यात वार्षिक किमान २५० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख जमा करण्याची तरतूद आहे. खाते किमान रकमेवर डीफॉल्ट आहे. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल.

२. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकते. मात्र आता यामध्ये खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही समावेश करण्यात आला आहे. पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.

३. नियमांमध्ये बदल केल्यानंतर खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.

४. पूर्वीच्या नियमांनुसार, मुलगी १० वर्षांची असताना खाते चालवू शकते. पण आता मुलींना १८ वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. पालक किंवा संरक्षक १८ वर्षे वयापर्यंत खाते चालवतील.

५. केंद्र सरकारच्या या योजनेत ८०सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. तिसऱ्या मुलीला याचा काही उपयोग होत नव्हता पण, आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघांसाठीही खाते उघडण्याची तरतूद आहे. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी तीन मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता. 

टॅग्स :केंद्र सरकार