Join us

रुपयाची नोट छापू शकते केंद्र सरकार

By admin | Updated: September 8, 2014 03:43 IST

केंद्र सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार असल्याचा सल्ला देत कायदा मंत्रालयाने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारला एक रुपयाची नोट छापण्याचा अधिकार असल्याचा सल्ला देत कायदा मंत्रालयाने गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे २, ५, १०, २०, ५०, १००, ५००, १०००, ५००० व १०,००० रुपयाची बँक नोट छापण्याचा अधिकार आहे. तसेच केंद्र सरकार एक रुपयाची नोट छापून बाजारात आणत होते.भारत सरकारकडे प्रत्येक मूल्याच्या नाण्याची निर्मिती करण्याचा अधिकार आहे. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या मते, चलन अध्यादेशातील कलम दोन रद्द झाल्याने भारत सरकारला एक रुपयाची नोट जारी करण्याचा अधिकार नाही. रिझर्व्ह बँक व भारत सरकार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा मंत्रालयाचा सल्ला मागविण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)