Join us

सेबी घेणार सीएंची मदत

By admin | Updated: January 19, 2015 02:23 IST

नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिग्रहण सौद्यात छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सेबीने चार्टर्ड अकाऊंटंट आणि मर्चंट बँकर्सची मदत घेण्याचे ठरविले आहे

मुंबई : नोंदणीकृत कंपन्यांच्या अधिग्रहण सौद्यात छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे योग्य मूल्य मिळावे, यासाठी सेबीने चार्टर्ड अकाऊंटंट आणि मर्चंट बँकर्सची मदत घेण्याचे ठरविले आहे. यातहत नवीन प्रवर्तकांमार्फत छोट्या गुंतवणूकदारांना दिल्या जाणाऱ्या मूल्यांबाबत स्वतंत्रपणे आकलन केले जाईल.सेबीने यासाठी पात्र चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) कंपन्यांची समिती स्थापन करणार आहे. ही समिती अधिग्रहण नियमानुसार शेअर्स मूल्यांकनाचे काम करील. सेबी शेअर्सच्या मूल्यांकनासाठी मर्चंट बँकर्सची मदत घेऊ शकते.