Join us

सीडीसाठी : मिकी-पर्रीकर

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

मिकीप्रकरणी आदेशामुळे आश्चर्य वाटले : पर्रीकर

मिकीप्रकरणी आदेशामुळे आश्चर्य वाटले : पर्रीकर
पणजी : अभियंता मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा झालेले गोव्याचे माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या शोधासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात शोध घेण्याचा आदेश दिला होता. याविषयी पर्रीकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना आश्यर्य व्यक्त केले.
आमदार मिकी पाशेको यांचे गायब होणे व मडगावच्या एका न्यायालयाने संरक्षणमंत्र्यांच्याही दिल्लीतील घर परिसराची झडती घ्या, अशा आदेशाविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारले. यावर पर्रीकर म्हणाले की, न्यायालयीन आदेशबाबत खूप आश्चर्य वाटले. तो आदेश येण्यापूर्वी एक दिवस अगोदर आपण दिल्लीतील घरात प्रवेश केला होता. मडगावच्या न्यायालयाचा तो आदेश वरच्या न्यायालयाने रद्द केल्याने आता मला त्याविषयी काही बोलायचे नाही. मिकीचा पत्ता न लागणे याच्याशी माझ्या दिल्लीतील घराचा काही संबंध नाही. मिकीने पोलिसांना शरण यावे, असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता, मी कुणाचे नाव घेत नाही; पण प्रत्येक शहाण्या माणसाने कायद्यानुसार वागावे, असे पर्रीकर म्हणाले. आमदार गायब होण्याची ही काही पहिलीच घटना नव्हे, असेही त्यांनी नमूद केले.