Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश लोया यांचे आकस्मिक निधन

By admin | Updated: December 2, 2014 00:35 IST

फोटो

फोटो
०१ बी़एस़ लोया या नावाने फोटो पाठवला आहे़
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश
लोया यांचे आकस्मिक निधन
नागपूर : देशात गाजलेल्या गुजरात येथील सोहराबुद्दीन खोटी चकमक खटल्याचे व मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी.एस. लोया यांचे रविवारी रात्री रविभवन येथे हृदयविकाराने निधन झाले.
प्राप्त माहितीनुसार लोया हे मुंबई येथील लिगल एड सर्व्हिसेसच्या अध्यक्षा आणि चंद्रपूर येथील तत्कालीन प्रधान जिल्हा न्यायाधीश स्वप्ना जोशी यांच्या मुलाच्या विवाह समारंभाानिमित्त नागपुरात आले होते. त्यांचा रविभवन येथे मुक्काम होता. रविवारी रात्री लोया यांची प्राणज्योत मालवली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरून खोट्या चकमकीचे हे प्रकरण अहमदाबाद येथून मुंबई येथील सीबीआय विशेष न्यायालयाकडे स्थानांतरित करण्यात आलेले आहे. लोया हे या न्यायालयाचे न्यायाधीश होते.
या प्रकरणी सीबीआयने या न्यायालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि आयपीएस दर्जाच्या अधिकार्‍यांसह ३७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. नुकतीच शाह यांना आरोप निि›त होईपर्यंत न्यायालयीन पेशीवर हजर होण्यापासून लोया यांच्या न्यायालयाने सूट दिली होती. आरोपपत्रानुसार ही खोटी चकमक नोव्हेंबर २००५ मध्ये घडली होती. मध्य प्रदेशच्या उज्जैन भागातील सोहराबुद्दीन अन्वर हुसैन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांचे हैदराबाद-सांगली या बसमधून अपहरण करून खोट्या चकमकीत त्यांना ठार करण्यात आले होते. त्यानंतर डिसेंबर २००६ मध्ये या खोट्या चकमकीचा साक्षीदार तुळशीराम प्रजापती यालाही अशाच पद्धतीने ठार करण्यात आले होते. ही दोन्ही प्रकरणे लोया यांच्या न्यायालयात होती.
लोया यांचे मूळ गाव लातूर हे आहे. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आसिफ कुरेशी यांनी शोक व्यक्त केला. (प्रतिनिधी)