करीअर
By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST
आयटी क्षेत्रातील विविध संधी
करीअर
आयटी क्षेत्रातील विविध संधीसध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. इतर उद्योगांच्या तुलनेत हे क्षेत्र झपाट्याने वाढत असून, या क्षेत्रात करिअरच्याही अनेक संधी उपलब्ध आहेत. अगदी मोबाईल, कॉम्प्युटरपासून क्षेपणास्त्रापर्यंतच्या उपकरणात तंत्रज्ञानाचा महत्त्वाचा वाटा आहे. माहिती तंत्रज्ञानात सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, असे मुख्य दोन प्रकार आहेत. सॉफ्टवेअरसिस्टीम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर असे दोन प्रकार पडतात. कॉम्प्युटरमध्ये असलेल्या विशिष्ट सॉफ्टवेअरमुळेच कॉम्प्युटरचे कार्य चालत असते. त्यामुळे ग्राहकांच्या गरजेनुसार सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाते. मॅन्युफॅक्चर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा एन्ट्री, प्रोग्रॅमर्स, अप्लिकेशन प्रोग्रॅमर्स, सपोर्ट सर्व्हिस, अशा क्षेत्रांमध्ये करिअर करण्यास संधी आहे. हार्डवेअरकॉम्प्युटर चिप्स, प्रोसेसर, सर्किट बोर्ड, की बोर्ड, प्रिंटर आदींमध्ये संशोधन आणि नावीन्यता आणण्याचे काम हार्डवेअर इंजिनिअर करीत असतो. मॅन्युफॅक्चर, मेंटेनन्स, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट यामध्ये करिअर करण्यास संधी आहे. अभ्यासक्रममाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी खालील कोर्स उपलब्ध आहेत. एम. टेक., बी. टेक., बी. ई.बीसीए - बॅचलर इन कॉम्प्युटर अप्लिकेशनबीसीएस - बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्सएमसीए - मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशनएमसीएस - मास्टर इनकॉम्प्युटर सायन्सएम. एस्सी. - मास्टर इन कॉम्प्युटर सायन्सडीसीए - डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशनपीजीडीसीए - पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन कॉम्प्युटर अप्लिकेशन याशिवाय हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्किंग तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक असे डिप्लोमा कोर्सही उपलब्ध आहेत. या क्षेत्रात प्रोग्रॅमर, वेबसाईट डेव्हलपिंग, विंडोज डेव्हलपिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेस्टर, डेव्हलपर, डिझायनर, डेटा बेस ॲडमिनिस्ट्रेटर, कंटेन्ट रायटर, अशा अनेक क्षेत्रांपैकी आपल्याला आवड असेल त्या क्षेत्रात करिअर करता येते.कौशल्यकॉम्प्युटर हाताळण्याचे ज्ञान, इंग्रजीवर प्रभुत्व आणि विशेष म्हणजे टेस्ट, लॉजिक, ॲटिट्यूड, नेमकेपणा, निर्णयक्षमता, नावीन्यता, आत्मविश्वास, कितीही वेळ काम करण्याची क्षमता, अचूकपणा या क्षमता तुमच्या अंगी असतील तर या क्षेत्रात तुम्हाला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे.