Join us  

कार कंपन्यांच्या नजरा गाव-खेड्यांकडे! दोन वर्षांत प्रवासी वाहन विक्री ५ टक्के वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 2:59 PM

कंपन्यांचा प्लान काय? जाणून घ्या सविस्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मागील काही वर्षांत शहरांच्या तुलनेत खेड्यांत अधिक वाहन विक्री होत आहे. त्यामुळे वाहन कंपन्यांनी आता खेड्यांत व्यवसाय वाढविण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. वित्त वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री सरासरी ३ ते ५ टक्के वाढण्याची शक्यता असून ४२ लाख वाहनांची विक्री होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी (प्रचार व विक्री) शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, कोविड साथीच्या काळात शहरांत वाहन विक्रीला ब्रेक लागलेला असताना ग्रामीण भागात जोरदार विक्री सुरू होती. एकूण प्रवासी वाहन विक्रीत ग्रामीण भागातील विक्रीचा वाटा ३२ ते ३३ टक्के आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ग्रामीण भागात व्यवसाय वृद्धीकडे लक्ष देण्याची सध्या गरज आहे. वित्त वर्ष २०१८-१९ मध्ये ग्रामीण भागातील मारुतीची कार विक्री ३८ टक्के होती. ती आता जवळपास ४५ टक्के झाली आहे.

कंपन्यांचा प्लान काय?

  • टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले की, २०२४ मध्ये टाटा मोटर्सची कार विक्री २०२० च्या तुलनेत ५ टक्के वाढली. यात ग्रामीण भागाचा वाटा ४० टक्के राहिला.
  • महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिनीकांत गोलागुंटा म्हणाले की, ग्रामीण भागांत रस्त्यांच्या सुविधा वाढल्याने विक्री वाढली. त्यामुळे ग्रामीण भागात व्यवसाय वाढवित आहोत.
टॅग्स :कारटाटामारुती सुझुकी