Join us

धोलवड येथे उसाचा ट्रॅक्टर व ट्रॉली उलटली

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

महिला ठार : चार गंभीर जखमी

महिला ठार : चार गंभीर जखमी
मढ : ओतूर :
धोलवड (ता. जुन्नर) येथील अंबीमळा येथे उसाचा ट्रॉक्टर व ट्रॉली उलटून राजश्री बाळू केदार (वय १६, रा. पानसरेवाडी, ओतूर) ही ठार झाली असून, सखूबाई लक्ष्मण दुधवडे, संगीता सुरेश मेंगाळ, संतोष बाळू मेंगाळ व चालक सोमनाथ काशिनाथ केदार हे गंभीर जखमी झाले.
या घटनेबाबत संतोष बाळू मेंगाळ (रा. धोलवड) यांनी फिर्याद दिली आहे. वरील सर्व मजुरीसाठी ज्ञानेश्वर किसन नलावडे याच्या शेतात ऊस तोडण्यासाठी गेले होते. तोडलेला ऊस ट्रॉलीत भरला. तसेेच त्यावर सखूबाई दुधवडे बसल्या, तर ट्रॉलीवर राजश्री बाळू केदार, संगीता सुरेश मेंगाळ, मोहन बाळू केदार हे बसले होते. ट्रॅक्टर व ट्रॉली शेतातून बाहेर आल्यानंतर आंबीशिवार येथे रस्त्यावर उसाची ट्रॉली झोल बसल्यामुळे उलटली. ट्रॉली उलटून त्यात बसलेले सर्व गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी सर्वांना ओतूर येथील प्रथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी राजश्री केदार या महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
०००