Join us

कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करा

By admin | Updated: September 20, 2014 02:42 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या पेट्रो-केमिकल उद्योगांना दिलासा देण्यासाठी कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी असोचेम संघटनेने केली आहे.

नवी दिल्ली : आर्थिक संकटात सापडलेल्या पेट्रो-केमिकल उद्योगांना दिलासा देण्यासाठी कच्च्या मालावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी असोचेम (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया) संघटनेने केली आहे. पेट्रो-केमिकल्स उद्योगांना लागणारा नाफ्ता, द्रवरूप नैसर्गिक वायू, प्रोपेन आणि ब्युटेन यांच्यावरील आयात शुल्क शुन्यावर आणावे, त्यामुळे या क्षेत्रत गुंतवणूक वाढू शकेल, असे असोचेमने स्पष्ट केले आहे. 
असोचेमने पेट्रो केमिकल उद्योगांच्या स्थितीचा अभ्यास केला असून त्यावर ‘इंपोर्ट डिपेंडन्सी ऑफ इंडियन मॅन्युफॅक्चरिंग’ शिर्षकाखाली एक अहवाल तयार केला आहे.
पेट्रो-केमिकल उद्योगांद्वारे तयार केल्या जाणा:या इथिलीन, प्रोपायलीन, बेंजीन, ब्युटाडाईन, पॉलीमर या उत्पादनांवरील आयात शुल्क, त्यांना लागणा:या कच्च्या मालाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे साहजिकच थेट ही उत्पादनेच आयात करण्यावर बहुसंख्य उद्योगांचा भर असतो. मात्र त्याचा देशांतर्गत पेट्रो-केमिकल उद्योगांना फटका बसत असल्याचे असोचेमला आढळले आहे.