Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅड जीडीपीच्या १.७ टक्के

By admin | Updated: May 27, 2014 06:07 IST

देशातील चालू खात्यातील तूट (कॅड) २०१३-१४ या आर्थिक वर्षात कमी होऊन सकल वार्षिक उत्पादच्या (जीडीपी) १.७ टक्के म्हणजेच ३२.४ अब्ज डॉलर झाली

 मुंबई : देशातील चालू खात्यातील तूट (कॅड) २०१३-१४ या आर्थिक वर्षात कमी होऊन सकल वार्षिक उत्पादच्या (जीडीपी) १.७ टक्के म्हणजेच ३२.४ अब्ज डॉलर झाली. भारतीय रिझर्व्ह बँकेने सांगितले की, व्यापारातील तोटा कमी झाल्याने कॅड कमी होऊन जीडीपीच्या १.७ टक्के किंवा ३२.४ अब्ज डॉलरवर आला. २०१२-१३ या आर्थिक वर्षात चालू खात्यातील तूट जीडीपीच्या तुलनेत ४.७ टक्के म्हणजेच ८७.८ अब्ज डॉलर होता. परकीय चलनाच्या अंत: व बाह्य प्रवाहाच्या अंतराला चालू खात्यातील तूट (कॅड) म्हणतात. मार्चमध्ये समाप्त झालेल्या तिमाहीत कॅड १.२ अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या ०.२ टक्के राहिला. मागील आर्थिक वर्षात याचकाळात कॅड १८.१ अब्ज डॉलर किंवा जीडीपीच्या ३.७ टक्के होता. मागील आर्थिक वर्षात कॅडमध्ये वाढ झाल्याने रुपया कोसळला होता. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात रुपया ६८.८५ प्रति अमेरिकन डॉलर झाला होता. व्यापारातील तूटीबाबत रिझर्व्ह बँकेने सांगितले की, निर्यातीत सुधारणा आणि आयातीत घट झाल्याने व्यापारातील तूट १४७.६ अब्ज डॉलरवर आली आहे. मागील आर्थिक वर्षात व्यापारातील तूट १९५.७ अब्ज डॉलर होती. (प्रतिनिधी)