Join us

मंत्रिमंडळ निर्णय

By admin | Updated: August 21, 2014 23:53 IST

कामगार विमा योजनेतील

कामगार विमा योजनेतील
७० अधिकारी नियमित
मुंबई : राज्य कामगार विमा योजनेत अस्थायी स्वरुपात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांना सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर पदांवर कायम करण्यास राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली.
राज्य कामगार विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ व ब या संवर्गात वैद्यकीय अधिकारी हे राजपत्रित पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील आहे. ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत असून राज्यात १३ रु ग्णालये व ६९ सेवा दवाखाने आहेत. त्यातील सर्व ७० वैद्यकीय अधिकार्‍यांना नियमित करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)