Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘एलआयसी’ची समभाग खरेदी

By admin | Updated: April 20, 2015 23:47 IST

एलआयसीने (भारतीय जीवन बीमा निगम) इन्फोसिसचे तीनशे रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. सरकारी मालकीच्या या विमा कंपनीने सॉफ्टवेअर सेवा कंपनीचे

नवी दिल्ली : एलआयसीने (भारतीय जीवन बीमा निगम) इन्फोसिसचे तीनशे रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. सरकारी मालकीच्या या विमा कंपनीने सॉफ्टवेअर सेवा कंपनीचे समभाग खरेदी करण्याची ही सलग चौथी तिमाही आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीतील खरेदीद्वारे एलआयसीचे इन्फोसिसमधील भागभांडवल ४.८१ टक्के झाले आहे. रोखे बाजाराकडील आकडेवारीनुसार, एलआयसीचे इन्फोसिसमधील भांडवल आॅक्टोबर-डिसेंबरदरम्यान ४.६९ टक्के होते. मार्चमध्ये ते ४.८१ टक्के झाले. एलआयसीचे कंपनीतील भांडवल ०.१२ टक्क्यांनी वाढले. इन्फोसिसच्या समभागांचे सध्याचे मूल्य पाहता एलआयसीने ३१७ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केल्याचे दिसते.