Join us  

Business Idea: SBI ची जबरदस्त ऑफर, महिन्याला मिळणार ७० हजार कमावण्याची संधी; पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 3:25 PM

स्टेट बँक ऑफ इंडियासोबत हातमिळवणी करून घरबसल्या कमाई करण्याची तुमच्याकडे उत्तम संधी आहे.

तुम्हाला घरबसल्या व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (SBI) हातमिळवणी करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही एसबीआय एटीएम फ्रँचायझी (SBI ATM Franchise) घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही दरमहा 60,000-70,000 रुपये कमावण्याची संधीही मिळणार आहे.

एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. बँक कधीही आपले एटीएम आपल्या आपण सेट करत नाही. बँकेच्या वतीने काही कंपन्यांना एटीएम बसवण्याचे कंत्राट दिले जाते, त्या वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम बसविण्याचे काम करतात. एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही चांगले पैसे कसे कमवू शकता ते पाहूया.

टाटा इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम यांच्याकडे भारतात एटीएम फ्रँचायझी स्थापित करण्याचा करार आहे. अशा परिस्थितीत एसबीआय एटीएमची फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला या कंपन्यांकडे अर्ज करावा लागेल. तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकता.

कायआहेतनियम?एटीएम सेट करण्यासाठी तुमच्याकडे 50-80 स्क्वेअर फूट जागा असावी. इतर एटीएमपासून त्याचे अंतर 100 मीटर असावे. ही जागा अशा ठिकाणी असावी, जी जागा लोकांना सहजरित्या दिसेल. याशिवाय 24 तास वीजपुरवठा असावा, तर 1 किलोवॅटची वीज जोडणीही आवश्यक आहे. या एटीएमची क्षमता दररोज 300 व्यवहारांची असावी. एटीएमला काँक्रीटचे छत असावे. V-SAT स्थापित करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.

कोणत्याकागदपत्रांचीआवश्यकता?यासाठी आयडी प्रुफ म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड असणं आवश्यक आहे. तसंच ॲड्रेस प्रुफ म्हणून रेशन कार्ड, इलेक्ट्रीसिटी बिल, याशिवाय बँक अकाऊंट आणि पासबूक, फोटो, ईमेल आयडी, फोन नंबर, अन्य आवश्यक कागदपत्रे, जीएसटी नंबर आणि फायनॅन्शिअल डॉक्युमेंट्सची गरज भासणार आहे.

अधिकृतवेबसाईटTata Indicash – www.indicash.co.inMuthoot ATM – www.muthootatm.com/suggest-atm.htmlIndia One ATM – india1atm.in/rent-your-space

कशीहोईलकमाई?एसबीआय एटीएमची फ्रेन्चायझी देणारी टाटा इंडिकॅश ही सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी 2 लाखांच्या सिक्युरिटी डिपॉझिटवर एटीएम फ्रँचायझी प्रदान करते. हे सिक्युरिटी डिपॉझिट रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतील. यातील एकूण गुंतवणूक 5 लाख रुपये आहे. SBI ATM च्या फ्रँचायझीला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रूपये आणि नॉन-कॅश ट्रान्झॅक्शनवर 2 रुपये मिळतात.

टॅग्स :एसबीआयव्यवसाय