Join us

नफेखोरीने तेजीला लगाम

By admin | Updated: August 20, 2014 22:49 IST

मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे 1क्6.38 आणि 22.2क् अंकांनी घसरला.

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील गेल्या सहा दिवसांच्या तेजीला बुधवारच्या सत्रत लगाम बसला. मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) अनुक्रमे  1क्6.38 आणि 22.2क् अंकांनी घसरला. जागतिक बाजारातील संमिश्र संकेत आणि गुंतवणूकदारांनी नफेखोरी केल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बुधवारी दिवसअखेर 26,314.29 अंकांवर तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 7,875.3क् वर
स्थिरावला.
तेल आणि गॅस, दैनंदिन गरजेच्या वस्तू, भांडवली वस्तू आणि ऑटो क्षेत्रत नफेखोरी झाली, तर दुसरीकडे औषधी, ऊर्जा, स्थावर आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले. जागतिक आणि स्थानिक पातळीवरील चांगल्या संकेतांमुळे गेल्या सहा दिवसांत बीएसई-निर्देशांक 1,क्91.53 अंकांनी ङोपावला.
मंगळवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 559.39 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. अमेरिकेतील गृहयोजनेबाबतच्या जबरदस्त आकडेवारीमुळे अमेरिकेचा शेअर बाजारही तेजीत राहिला. तसेच चीन वगळता आशियातील बहुतांश शेअर बाजारात चांगले वातावरण होते. तथापि, युरोपियन बाजाराचा कल घसरणीकडे होता.
 
4जागतिक स्तरावरून फारसे बळ न मिळाल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. गुंतवणूकदारांनी मुख्यत: औषधी कंपन्यांना प्राधान्य दिले. सहा दिवसांच्या तेजीनंतर नफेखोरी होणो स्वाभाविक आहे, असे रेलिगेयर सिक्युरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक म्हणाले.
 
4बीएसई-3क् पैकी 19 शेअर्स तोटय़ात राहिले, तर 11 कंपन्यांचे शेअर्स फायद्यात राहिले. तोटय़ातील शेअर्समध्ये ओएनजीसी, टाटा मोटर्स, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचडीएफसी, आयटीसी, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचा समावेश आहे.