Join us  

दिवाळीच्या आनंदाचे भारवाहक!, सणांमुळे मिळतो पैसा; कुरिअर बॉइजना मोठी मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:53 AM

यंदाच्या दिवाळीत आॅनलाइन शॉपिंग जोरात आहे. दिवाळीत आनंद देणाºया या शॉपिंगचा भार वाहण्याचे काम देशभरात ‘डिलिव्हरी बॉइज’मुळेच शक्य होते. यंदा अनेक कंपन्यांनी त्यासाठी...

नवी दिल्ली : यंदाच्या दिवाळीत आॅनलाइन शॉपिंग जोरात आहे. दिवाळीत आनंद देणाºया या शॉपिंगचा भार वाहण्याचे काम देशभरात ‘डिलिव्हरी बॉइज’मुळेच शक्य होते. यंदा अनेक कंपन्यांनी त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात का होईना, काही हजार तरुणांची नियुक्ती केली आहे. घराघरांत वस्तू पोहोचविणारी ही मुले खरे म्हणजे ‘आनंदाचे भारवाही’च म्हणायला हवीत.शहराच्या एका टोकापासून दुसºया टोकापर्यंत फिरणारी ही मुले आय पेन्सिल ते इव्हिनिंग ड्रेस आणि मिक्सर ग्राइंडर ते मोबाइल फोन अशा सर्व प्रकारच्या वस्तू घरोघर पोहोचविताना दिसत आहेत. त्यांच्यापैकी एक आहे निबेश यादव. ग्राहकांची मागणी वाढलेली असताना तो दररोज २०० वस्तूंची डिलिव्हरी करतो. एका वस्तूसाठी त्याला १४ ते २० रुपये मोबदला मिळतो. सर्व वस्तूंचे वितरण रात्री ८ वाजेच्या आत पूर्ण होणे आवश्यक असते. त्यासाठी त्याला प्रचंड धावपळ करावी लागते. निबेश म्हणतो की, हे काम कठीण आहे; पण जे आहे ते आहे. पैसा कमवायचा असेल, तर तेवढी मेहनतही करायलाच हवी. वाहनाचा इंधन खर्च तसेच वस्तू खराब झाल्याचा खर्च निबेशलाच करावा लागतो. तो अनेक कंपन्यांसाठी काम करतो. अ‍ॅमेझॉन एका वस्तूच्या वितरणासाठी १८ रुपये, तर मायंत्रा आणि जाबोंग १४ रुपये देतात. त्याने आणखी एक मुलगा स्वत:च्या अखत्यारीत कामावर ठेवला आहे.हंगामाच्या काळात आउटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यांना बोलावले जाते. अ‍ॅमेझॉनचे देशभरात ३५० भागीदार नोड्स तर १,७५,००० ‘आय हॅव स्पेस’ स्टोअर्स भागीदार आहेत. ही मुले या भागीदारांकडून कामावर असतात. मायंत्रा हंगामाच्या काळात १ हजार लोकांना कामावर घेते. याशिवाय ‘मायंत्रा एक्स्टेंडेड नेटवर्क थ्रु स्टोअर अ‍ॅक्टिव्हेशन’ नावाचे त्यांचे नेटवर्क आहे. त्यात २ हजार स्टोअर्सचा समावेश आहे. ते डिलिव्हरीचा भार उचलतात.रोजगार आहे, पण कायम नाही२० ते ३० या वयोगटातील ही मुले महानगरांत पाठीवर मोठमोठी ओझी घेऊन इमारतीच्या पायºया चढताना, कधी लिफ्टमध्ये शिरताना तर कधी सिग्नलवर घाम पुसताना दिसून येतात. ही मुले १२-१२ तास काम करतात. यातील बहुतांश मुले अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मायंत्रा यांसारख्या आॅनलाइन कंपन्यांचे थेट कर्मचारी नाहीत. सणासुदीच्या काळात या तात्पुरत्या रोजगारात २०० टक्के वाढ झाल्याचे आसानजॉब्जने म्हटले आहे.

टॅग्स :अॅमेझॉनऑनलाइनबाजार