Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईच्या खरेदीने सराफा बाजारात तेजी

By admin | Updated: April 20, 2015 23:46 IST

जागतिक बाजारातील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी तेजीचा कल नोंदला गेला आहे. आज सोन्याचा भाव

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी तेजीचा कल नोंदला गेला आहे. आज सोन्याचा भाव लग्नसराईच्या खरेदीने १२५ रुपयांनी वधारून २७,२०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीचा भावही २०० रुपयांच्या सुधारणेसह ३७,००० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. जागतिक बाजारात तेजीचा कल असल्याच्या पार्श्वभूमीवर लग्नसराईच्या काळातील ग्राहकी पूर्ण करण्यासाठी स्थानिक सराफ्यात जोरदार खरेदी झाली. यामुळे या मौल्यवान धातूंच्या भावात चांगलीच वाढ नोंदली गेली आहे. सिंगापूर येथे सोन्याचा भाव वधारून १,२०५.३० डॉलर प्रतिऔंस राहिला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १२५ रुपयांच्या सुधारणेसह अनुक्रमे २७,२०० रुपये आणि २७,०५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात शनिवारी ८५ रुपयांची वाढ झाली होती. तथापि, आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी उंचावून ३७,००० रुपये व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १९० रुपयांनी वधारून ३६,६४५ रुपये प्रतिकिलो राहिला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व ५७,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)