नवी दिल्ली : मागणीत जोर नसल्याने आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामोडींमुळे राजधानी दिल्ली सराफा बाजारातील गेल्या तीन दिवसांच्या तेजीला विराम बसला. दिल्लीत सोन्याचा भाव ६० रुपयांनी घसरत प्रति दहा ग्रॅम २७०० रुपयांवर आला. चांदीचा भावही १५० रुपयांनी कमी होत प्रति किलो ३५ हजारांवर आलादागदागिने तयार करणारे व्यावसायिक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून मागणीत जोर नव्हता. तसेच चीनची आर्थिक वाटचाल धीमी पडल्याने जागतिक पातळीवर मंदीची लक्षणे बळावल्याने दिल्ली सराफा बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे सोन्याचा भाव उतरला.जागतिक पातळीवर सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस १४.५४ डॉलरने घसरत १,१३८.३५ डॉलरवर आला. राजधानी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ६० रुपयांनी उतरला. गेल्या तीन दिवसांत दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ४१० रुपयांनी वधारला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सराफा बाजारातील तेजीला लगाम
By admin | Updated: September 2, 2015 23:12 IST