Join us  

Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ

By प्रविण मरगळे | Published: February 01, 2021 1:30 PM

Budget 2021 Latest News and updates: परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने २०१९ मध्ये सेक्शन 80EEA लागू केला होता

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर करत आहेत, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या अर्थसंकल्पाकडून लोकांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. यात केंद्राने घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी सेक्शन 80EEA अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखांपर्यंत अतिरिक्त सूटची मर्यादा १ वर्षापर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा ३१ मार्च २०२२ पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.

रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालना

परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने २०१९ मध्ये सेक्शन 80EEA लागू केला होता, याअंतर्गत Repayment वर दीड लाखांपर्यत अतिरिक्त सूट मिळत होती, ही सूट सेक्शन २४ बीच्या वेगळी होती, घरकर्जाच्या व्याजावरील पेमेंटवर प्रत्येक वर्षी २ लाखापर्यंत सूट मिळत होती, सरकारने यंदाच्या बजेटमध्ये परवडणाऱ्या घरांच्या योजनेत कोणताही बदल केला नाही. Affordable Housing ला सरकारने कार्पेट एरिया आणि घराची किंमत याआधारे विभाजन केले आहे. Home Loan च्या प्रिसिंपल अमाऊंटच्या रिपेमेंटवर सेक्शन 80 सीमधून सूट मिळते.(Budget 2021 Latest News and updates)

घराची किंमत ४५ लाखापेक्षा जास्त नको

 सेक्शन ८० EEA चा लाभ घेण्यासाठी पहिली अट घराची किंमत ४५ लाखापेक्षा जास्त नसावी, गृहकर्ज १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२१ च्या कालावधीत घेतलेले असावं, हीच हेडलाईन ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी कार्पेट एरिया ६० स्क्वेअर मीटर किंवा ६४५ स्क्वेअर फूटापेक्षा जास्त नको, ही अट शहरांसाठी आहे, ज्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरू, नोएडा, गुरूग्राम, हैदराबाद, कोलकातासारख्या शहरांचा समावेश आहे. अन्य शहरांसाठी कार्पेट एरिया जास्तीत जास्त ९० मीटर अथवा ९६८ स्क्वेअर फूट असू शकतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी  

जुन्या नियमानुसार, सेक्शन 80 EEA चा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा कोणत्या रिएल इस्टेट प्रकल्पाला १ सप्टेंबर २०१९ च्या आधी परवानगी मिळालेली हवी. सध्या करदात्यांना सेक्शन २४ बी चा फायदा घ्यायला हवा, त्यानंतर 80EEA चा फायदा घेऊ शकतात. (Budget 2021 Latest News and updates)

जुन्या कारचं आयुष्य ठरलं, अर्थसंकल्पात 'व्हेईकल स्क्रॅप पॉलिसी'चा समावेश 

टॅग्स :बजेट 2021निर्मला सीतारामनघर