Join us  

budget 2020 : अर्थसंकल्पानंतर विक्रीचा मोठा दबाव, शेअर गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपये बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 8:51 AM

लाभांश वाटपावरील कर रद्द झाल्याने कंपन्यांचा नफा वाढणार असला तरी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करपात्र होणार असल्याने बाजारात नाराजीची भावना

- प्रसाद गो. जोशीमुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये बाजाराला असलेल्या अपेक्षांची फारशी पूर्तता झालेली नसल्याने बाजाराने मोठी घसरण नोंदवून निराशा व्यक्त केली. दिवसाच्या अखेरीस संवेदनशील निर्देशांक ४० हजारांच्या खाली तर निफ्टी ११,७०० अंशांच्या खाली बंद झाले. बाजारावरील निराशेचे मळभ एवढे मोठे होते की दिवसभरात सेन्सेक्स १२०० अंशांहून अधिक खाली आला.अर्थमंत्री सीतारामन यांनी जुनी मागणी असलेला डिव्हीडंट डिस्ट्रीब्युशन टॅक्स रद्द केल्याची घोषणा केली असली तरी अर्थसंकल्पिय तूट वाढणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे बाजाराने चिंता व्यक्त केली. ही चिंता मोठ्या घसरणीने व्यक्त झाली. लाभांश वाटपावरील कर रद्द झाल्याने कंपन्यांचा नफा वाढणार असला तरी गुंतवणूकदारांना मिळणारा लाभांश करपात्र होणार असल्याने बाजारात नाराजीची भावना व्यक्त झाली.आयकरामधील बदलांबाबत बाजारामध्ये संमिश्र भावना व्यक्त झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांना काही शासकीय रोख्यांमध्ये गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीमुळे बाजारात काहीसे आनंदाचे वातावरण होते. मात्र भाषणाच्या उत्तरार्धामध्ये बाजारावर विक्रीचे दडपण आले.दिवसअखेर संवेदनशील निर्देशांक ९८७.९६ अंश म्हणजेच २.४३ टक्कयांनी घसरून ३९,७३५.५३ अंशांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी हा निर्देशांक ३००.२५ अंश म्हणजे २.५१ टक्कयांनी घसरून ११६६१.८५ अंशंवर बंद झालेला दिसून आला. बाजारात ठराविक समभागांमध्ये वाढ झालेली दिसून आली

बाजारातील चढ-उतार१५0 अर्थसंकल्प सुरू होण्याआधी बाजारात सकारात्मक वातावरण होते. सकाळी बाजार १५० अंशांवर होता. अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावरही काही काळ निर्देशांक वर होता.५३० अर्थसंकल्पीय तूट वाढणार असल्याचे लक्षात आल्याने बाजार खाली आला. दुपारी१ वा. निर्देशांक ५३० अंशांनी घसरल्याचे दिसले.९८७ बाजारावर विक्रीचे मोठे दडपण आल्याने बाजार एक हजार अंशांपेक्षा अधिक घसरला. मात्र शेवटच्या अर्ध्या तासामध्ये काही प्रमाणात खरेदी झाल्याने बाजार थोडा वर गेला.07 वर्षांमध्ये जाहीर झालेल्या अर्थसंकल्पांमध्ये बाजाराने हिंदोळे घेतलेले दिसून येतात. विद्यमान अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या दोन्ही अर्थसंकल्पांनंतर बाजारात घसरण झालेली दिसून आली.मागील वर्षाच्या अर्थसंकल्पानंतरही शेअर बाजार घसरला होता.४ लाख कोटींची संपत्ती गमावलीशेअर बाजारात शनिवारी झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या घसरणीमुळे बाजाराचे भांडवल मूल्य ४ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.सुटीच्या दिवशी व्यवहारशनिवारी शेअर बाजाराला सुटी असते . मात्र केंद्रीय अर्थसंकल्प असल्यामुळे शनिवारी शेअर बाजार चालू ठेवला गेला होता. विशेष बाब म्हणून शनिवारी शेअर बाजारामध्ये व्यवहार घेण्यात आले. यापूर्वी २०१५मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प शनिवारी सादर केला गेल्यामुळे बाजारामध्ये त्या दिवशी व्यवहार घेतले गेले होते.भांडवली नफ्यावरील कर कायममागील अर्थसंकल्पामध्ये लादण्यात आलेला दीर्घकालीन भांडवली नफ्यावरील कर मागे घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात होती. गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळावे यासाठी हा कर मागे घेतला जाईल, अशी अपेक्षाही होती. मात्र अर्थमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले नसून हा कर कायम राहिल्याने बाजारात नाराजी आहे. 

टॅग्स :बजेटबजेट माहितीबजेट क्षेत्र विश्लेषण