Join us  

बीएसएनएलच्या मालमत्ता विक्रीतून मिळणार २५ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 6:21 AM

मुख्य महाव्यवस्थापकांची माहिती; राज्याचा हिस्सा ११ हजार कोटींचा, एप्रिल-मेपासून बीएसएनएलची फोर जी सेवा होणार सुरू

खलील गिरकर 

मुंबई : राज्यात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची बहुप्रतीक्षित फोर जी सेवा एप्रिल - मे महिन्यात सुरू होईल, असा विश्वास बीएसएनएलचे महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक मनोजकुमार मिश्रा यांनी व्यक्त केला. बीएसएनएलच्या जमीन व मालमत्ता विक्रीतून देशभरात सुमारे २५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची शक्यता असून एकट्या महाराष्ट्राचा त्यामधील हिस्सा सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा असेल, असे मिश्रा यांनी सांगितले.

जमीन विक्री प्रक्रिया क्लिष्ट व किचकट असल्याने त्याला ३ ते ४ वर्षे लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. बीएसएनएलच्या मालकीची जमीन विक्री केल्यानंतर मिळणारा पैसा केंद्र सरकारकडे जमा होईल. त्यानंतर सरकार तो निधी बीएसएनएलला देईल. देशातील बीएसएनएलचे सर्वांत मोठे सर्कल असलेल्या महाराष्ट्र आणि गोवा सर्कलमध्ये बीएसएनएलची जमीन, मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे देशाच्या एकूण २५ हजार कोटी रकमेमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा देशात सर्वांत जास्त म्हणजे सुमारे ११ हजार कोटींचा असेल.बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेला मोठा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बीएसएनएलमधील उर्वरित कर्मचाऱ्यांवर व अधिकाºयांवर कामाचा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी काही पदांवर तातडीने कंत्राटी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. ही जबाबदारी ३० एप्रिलपर्यंतच्या कालावधीसाठी असून त्यानंतर पुढील भरतीबाबत निविदा प्रक्रिया राबवून प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.जमीन विक्री केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत असणाºयाद डिपार्टमेंट आॅफ इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड पब्लिक असेट मॅनेजमेंट ‘दीपम’द्वारे केली जाईल, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले.बीएसएनएल बंद होणार नाहीग्राहकांचे हित आमच्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असून ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. बीएसएनएल व एमटीएनएलचे विलीनीकरण करण्याची प्रक्रिया पुढील दोन वर्षांत पूर्ण केली जाईल. स्वेच्छानिवृत्ती योजना राबविल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बीएसएनएल बंद होणार नाही; उलट त्याचे पुनरुज्जीवन करण्यात येईल, अशी ग्वाही मिश्रा यांनी दिली. 

टॅग्स :बीएसएनएल