Join us  

BSNL मोफत देतेय तीन महिन्यांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी, सर्व प्लॅनमध्ये मिळणार 2GB डेटा; पाहा ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 8:37 PM

उरलेत अखेरचे दोन दिवस, तुम्ही तुमच्या BSNL प्रीपेड प्लॅनची ​​वैधता तीन महिन्यांपर्यंत मोफत वाढवू शकता.

जर तुम्ही बीएसएनएल (BSNL) यूजर असाल तर या महिन्याचे पुढील दोन दिवस तुमच्यासाठी खूप खास आहेत. या दोन दिवसांमध्ये, तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. तुम्ही तुमच्या BSNL प्रीपेड प्लॅनची ​​वैधता तीन महिन्यांपर्यंत (९० दिवस) मोफत वाढवू शकता. कंपनी तिच्या तीन प्लॅनमध्ये एक ते तीन महिन्यांची अतिरिक्त वैधता मोफत देत आहे. या जबरदस्त ऑफरची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. कंपनीच्या 797 रुपये 2399 रुपये आणि 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत एक्स्ट्रा व्हॅलिडिटी दिली जात आहे.

PV 797 मध्ये मिळणारे बेनिफिट्सकंपनीचा हा प्लान एक वर्षाच्या वैधतेसह येतो. खास गोष्ट म्हणजे ऑफर अंतर्गत तुम्हाला या प्लानमध्ये 30 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा देण्यात येतो. प्लॅनमध्ये, कंपनी देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील देत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 60 दिवसांसाठी दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.

PV 2399 मध्ये मिळणारे बेनिफिट्सकंपनी या प्लॅनमध्ये दोन महिन्यांची (60 दिवस) अतिरिक्त वैधता देत आहे. हा प्लॅन 365 दिवसांचा असला तरी, तुम्ही 31 मार्चपूर्वी सब्सक्राइब केल्यास तुम्हाला 425 दिवसांसाठी रिचार्ज करण्याची गरज नाही. प्लॅनमध्ये, तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएस मिळतील. तसंच कंपनी या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा ऑफर करते.

PV 2999 मध्ये मिळणारे बेनिफिट्सकंपनी या प्लॅनमध्ये 365 दिवसांची वैधता देते.जर तुम्ही 31 मार्चपूर्वी या प्लॅनसह तुमचा नंबर रिचार्ज केला तर तुम्हाला 90 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत मिळेल. यामध्ये दररोज 2GB डेटा, 100 मोफत SMS आणि एकूण 455 दिवस अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :बीएसएनएल