मुंबई : भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे एकूण भांडवल आज 1क्क् लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले. उल्लेखनीय म्हणजे गेल्या दशकभरात गुंतवणूकदारांच्या भांडवलात 1क् पटीहून अधिक वाढ झाली आहे.
देशातील सर्वात मोठा समभाग बाजार असलेल्या मुंबई शेअर बाजारातील सर्वच सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलाच्या दृष्टीने संकलित आकडेवारीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला. भारतीय शेअर बाजारात आज सकाळच्या व्यवहारात 1क् वाजून पाच मिनिटाला गुंतवणूकदारांचे एकूण भांडवल वाढून 1क्क्.क्1 लाख कोटी रुपये झाले.
बीएसईच्या 3क् शेअर्सचा सेन्सेक्स तेजी कायम राखत 3क्क् हून अधिक अंकांवर गेला. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलाने सुमारे 11 वर्षापूर्वी 2क्क्3 मध्ये 1क् लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. पाच वर्षापूर्वी 2क्क्9 मध्ये हा आकडा सुमारे 5क् लाख कोटी रुपये झाला होता. सेन्सेक्सवरील 3क् कंपन्यांचा देशातील सर्वात मोठय़ा कंपन्यांमध्ये समावेश आहे. एकूण बाजार भांडवलाच्या दृष्टीने या गुंतवणूकदारांचा वाटा जवळपास 5क् टक्के वा 47 लाख कोटी रुपये आहे.
टीसीएस कंपनीकडे सर्वाधिक भांडवल आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रतील टीसीएस ही देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे. कंपनीचे बाजारमूल्य पाच लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. यानंतर सरकारी कंपनी ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचा क्रमांक आहे.
या दोन्ही कंपन्यांचे भांडवल तीन-तीन लाख कोटी रुपये आहे.
आयटीसी, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एसबीआय व कोल इंडिया या कंपन्याचे बाजार मूल्य दोन लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. याशिवाय आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, सन फार्मा, एचयुएल, भारती एअरटेल, एलअॅण्डटी, विप्रो, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, एनटीपीसी व अॅक्सिस बँक यांचे भांडवल एक-एक कोटी रुपयाहून अधिक आहे. यापैकी आयसीआयसीआय बँक दोन लाख कोटी रुपये भांडवल गटात जाण्याच्या तयारीत आहे.(प्रतिनिधी)