Join us
Daily Top 2Weekly Top 5

बीएसई सेन्सेक्स किंचित वधारला

By admin | Updated: May 27, 2014 06:06 IST

सुरुवातीच्या सत्रात २५ हजारांपुढे उडी घेतल्यानंतर अखेरीस नफेखोरीमुळे २३.५३ अंकांनी वधारून २४,७१६.८८ अंकांवर बंद झाला.

मुंबई : सुरुवातीच्या सत्रात २५ हजारांपुढे उडी घेतल्यानंतर अखेरीस नफेखोरीमुळे २३.५३ अंकांनी वधारून २४,७१६.८८ अंकांवर बंद झाला. ३० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला बीएसई सुरुवातीला ४८२ अंकांनी वधारला होता. त्यामुळे बाजार २५,१७५ अंकांपर्यंत पोहोचला होता. सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, कॅपिटल गुडस्, आॅटो आणि रियल्टी क्षेत्रातील कंपन्यांमुळे बाजाराला झळाळी मिळाली. मात्र, दुपारनंतर नफाखोरी सुरूझाल्याने बाजार २४,४३३ पर्यंत कोसळला होता. अखेरीस २३.५३ अंकांनी किंवा ०.१० टक्क्यांनी वधारून २४,७१६.७७ अंकांवर बंद झाला. शुक्रवारी बाजार २४,६९३.३५ अंकांवर बंद झाला होता. भेल, टाटा पावर आणि गेल या कंपन्यांसह १८ कंपन्यांचे शेअर्स कोसळले, तर महिंद्रा अँड महिंद्रा, सेसा स्टरलाईट आणि विप्रोसह १२ कंपन्यांचे शेअर्स वधारले. ५० कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेला निफ्टीने ७,५०४ची मजल गाठली होती; परंतु अखेरीस उच्चांकावरून परत येत ७,३५९.०५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ८.०५ अंकांनी किंवा ०.११ टक्क्यांनी कोसळून बंद झाला. परकीय चलन बाजारात रुपया २९ पैशांनी कोसळून ५८.८१ प्रति अमेरिकन डॉलरवर बंद झाला. बंद होण्यापूर्वी रुपया ५८.४० प्रति डॉलरपर्यंत पोहोचला होता. (प्रतिनिधी)