Join us  

स्वीस बँकांत पैसे ठेवणाऱ्यांमध्ये ब्रिटन अव्वल, तर भारत जगात ७७वा स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:24 AM

आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे.

नवी दिल्ली : ज्या देशांचे नागरिक व व्यावसायिक यांचा स्वीस बँकांत पैसा आहे, त्या देशांच्या जागतिक यादीत २०१९ मध्ये भारताची तीन स्थानांची घसरण झाली आहे. आदल्या वर्षी ७४ व्या स्थानी असलेला भारत २०१९ मध्ये ७७ व्या स्थानी आला आहे. स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार पहिल्या स्थानावर ब्रिटन कायम आहे.स्वीस नॅशनल बँकेने (एसएनबी) वार्षिक बँकिंग आकडेवारी जारी केली आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. स्वीस बँकांत असलेल्या विदेशी नागरिकांच्या एकूण पैशात भारतीय नागरिक अथवा व्यावसायिकांच्या पैशाचे प्रमाण अत्यंत नगण्य ०.०६ टक्के आहे. स्वीस बँकांच्या भारतीय शाखांतील पैशाचाही यात समावेश आहे. या तुलनेत ब्रिटिश नागरिकांचा यातील वाटा तब्बल २७ टक्के आहे.२०१९ मध्ये भारतीयांकडून स्वीस बँकांत (भारतीय शाखांसह) पैसा ठेवण्याचे प्रमाण ५.८ टक्क्यांनी घसरून ८९९ स्वीस फ्रँकवर (६,६२५ कोटी रुपये) आले. ही स्वीस बँकांनी एसएनबीला दिलेली अधिकृत आकडेवारी असून, यातून काळ्या पैशाचे कोणतेही सूचन होत नाही. याशिवाय भारतीय नागरिक, अनिवासी भारतीय अथवा इतरांनी तिसऱ्या देशाच्या संस्थांमार्फत स्वीस बँकांत ठेवलेल्या पैशाचा यात समावेश नाही.सर्वोच्च दहा देशांचा यातील वाटा जवळपास दोनतृतीयांश आहे. सर्वोच्च दहा देशांत जर्मनी, लुक्झेंबर्ग, बहामास, सिंगापूर आणि केमॅन आयलॅण्ड यांचा समावेश आहे. सर्वोच्च १५ देशांचा यातील वाटा जवळपास ७५ टक्के, तर सर्वोच्च ३० देशांचा वाटा जवळपास ९० टक्के आहे. पाच देशांचा समूह असलेल्या ‘ब्रिक्स’ गटात भारताचा सर्वांत कमी, तर २०व्या स्थानी असलेल्या रशियाचा सर्वाधिक पैसा स्वीस बँकांत आहे.>ब्रिटन अव्वल स्थानावरस्वीस बँकांत पैसा असणाºया सर्वोच्च पाच देशांत ब्रिटन, अमेरिका, वेस्ट इंडीज, फ्रान्स आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे. स्वीस बँकांत असलेल्या एकूण विदेशी निधीत या पाच देशांचा वाटा ५0 टक्क्यांपेक्षाही अधिक आहे.

टॅग्स :स्विस बँकस्वित्झर्लंड