Join us  

ब्रिक्स परिषद : मोदी-पुतीन यांच्यात ‘तेल’चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 1:04 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यावर तसेच अफगाणिस्तानच्या सुरक्षा स्थितीवरही चर्चा केली.

शीयामेन (चीन) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यावर तसेच अफगाणिस्तानच्या सुरक्षा स्थितीवरही चर्चा केली. दक्षिण पूर्व चीन शहरात आयोजित ब्रिक्स संमेलनादरम्यान या नेत्यात चर्चा झाली. तेल व नैसर्गिक गॅसच्या क्षेत्रात सहकार्याचा मुद्दाही या वेळी चर्चिला गेला.पंतप्रधान मोदी हे मंगळवारी म्यानमारला रवाना होणार आहेत. तत्पूर्वी ते चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमारयांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. पुतीन यांनी मोदी यांच्या रशिया दौºयाच्या आठवणींना उजाळा दिला. ‘इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’मध्ये भारताने केलेल्या भागीदारीबद्दल त्यांनी मोदी यांचे आभार मानले. अफगाणसह क्षेत्रीय मुद्द्यांवर चर्चा झाली. पण, याची विस्तृत माहिती देण्यास रवीश कुमार यांनी नकार दिला.रवीश कुमार यांनी सांगितले की, या वर्षी रशियात आयोजित करण्यात आलेल्या ‘फेस्टिव्हल आॅफ इंडिया’चा पुतीन यांनी उल्लेख केला. दोन्ही देशांत पर्यटनाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांच्या आदान-प्रदानावर चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ब्राझिलचे राष्ट्रपती माइकल टेमर यांच्याशी चर्चा केली. मोदी आणि माइकल टेमर यांनी ‘कॉमन ग्लोबल व्हिजन’वर आधारित भागीदारीवर चर्चा केली. (वृत्तसंस्था)

टॅग्स :नरेंद्र मोदी